मुंबई : मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाचा तिढा सुटण्याची चिन्हं दिसत असतानाचा यात पुन्हा अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सरकारच्या या अध्यादेशाला खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी अध्यादेश काढताना सरकारने खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांचादेखील विचार करण्याची मागणी खुल्या वर्गातील पालकांनी केली आहे.

खुल्या वर्गातील पालकांच्या मागणीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांना एसईबीसी कोट्यातुन प्रवेश न देता मेरिट नुसार प्रवेश द्यावे आणि अध्यादेश काढताना राज्य सरकराने आमच्या वर अन्याय होणार नाही याचा सुद्धा विचार करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय, त्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी खुल्या वर्गातील विद्यार्थी-पालकांनी केली आहे.

VIDEO | मेडिकल प्रवेशाचा तिढा सुटणार, मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल प्रवेशासाठी उद्या अध्यादेश | एबीपी माझा



दरम्यान आज दुपारी 12 वाजता राज्य कॅबिनेटची बैठक होणार आहे. या बैठकीतच मराठा विद्यार्थ्यांच्या मेडिकल पीजी प्रवेशाचा तिढा सोडवण्यासाठी सरकार अध्यादेश काढणार असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. अध्यादेशानंतर मराठा विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता तिथंच त्यांचे प्रवेश कायम राहतील.

यावर्षी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू न करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने देखील हाच निर्णय कायम ठेवलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाला विरेध करत मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने अखेर अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Maratha Reservation | खासदार संभाजी राजे आंदोलनकर्त्या मेडिकल विद्यार्थ्यांच्या भेटीला | मुंबई | एबीपी माझा



संबंधित बातम्या

Maratha Resarvation : वैद्यकीय पदव्युत्तर विद्यार्थी आंदोलन : निवडणूक आयोगाची अध्यादेश काढण्यास परवानगी?

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवडाभराची मुदतवाढ; मात्र ठोस आश्वासन मिळेपर्यंत विद्यार्थी आंदोलनावर ठाम

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशाला आठवड्याभराची मुदतवाढ, मुख्यमंत्र्यांचा मराठा विद्यार्थ्यांना दिलासा

12 वीच्या विद्यार्थ्यांना एमबीबीएस, बीडीएस प्रवेशासाठी यंदा मराठा आरक्षण नाही?