मुंबई: ‘मागेल त्याला शेततळी देणार’, ही घोषणा किती फोल आहे. याचं उदाहरण समोर आलं आहे. कारण महाराष्ट्रात मे महिन्यापर्यंत फक्त पाच हजार शेततळी बांधण्यात आली आहेत. ही माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं माहितीच्या अधिकाराखाली दिली आहे.
2016 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात राज्यात पाच लाख शेततळी बांधणार अशी घोषणा केली होती. तर देशात 10 लाख शेततळी बांधू असा दावा केंद्र सरकारनं केला होता. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारचे दोन्ही दावे सपशेल फोल ठरताना दिसत आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रापेक्षा आंध्र प्रदेश आणि झारखंडमध्ये जास्त शेततळी बांधण्यात आली आहेत. झारखंडमध्ये तब्बल 92 हजार शेततळी बांधण्यात आली आहेत.
पुण्यातील परिवर्तनचे संचालक तन्मय कानिटकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागवली होती.
केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी घोषणा केली होती की, 2016-17 मध्ये 10 लाख शेततळ बांधून होतील. मार्च 2017 पर्यंत 10 लाख शेततळी बांधून होतील. पण 5 मेपर्यंत संपूर्ण देशात फक्त 5 लाख 78, 589 शेत तळी बांधून झाली आहेत.
-संपूर्ण देशातील 5 लाख 78 हजार 589 तळ्यांपैकी महाराष्ट्रात फक्त 5210 तळी आहेत.
-देशात सगळ्यात जास्त शेततळी आंध्रप्रदेशमध्ये आहेत. तब्बल 3 लाख 11 हजार 361 शेततळी इथं बांधण्यात आली आहेत.
-त्याच्या खाली झारखंडचा क्रमांक लागतो. झारखंडमध्ये तब्बल 92 हजार 509 तळी आहेत.
- पश्चिम बंगालमध्ये 30 हजार 322 शेततळी बांधली आहेत