पाणी पातळी कमालीची खाली गेल्याने जून महिन्यापर्यंत पाणी पुरवण्याचं आव्हान प्रशासनासमोर निर्माण झालं आहे. अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पाणी पातळी 15 टक्क्यांवर आली असल्याचं आढळून आलं.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या दमदार पावसानंतर उजनी धरणातून जवळपास दोन वर्षांनंतर विसर्ग सुरु करण्यात आला होता. उजनी हे 117 TMC क्षमतेचे धरण असून याच्या मृत साठ्यात 63 TMC पाणी साठविण्याची क्षमता आहे.
उजनीतून पुणे, सोलापूर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांना पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे जूनपर्यंत पाणी पुरवण्याचं आव्हान प्रशासनासमोर असेल.
संबंधित बातम्या :