नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाने नीट म्हणजेच वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षेसाठी परीक्षा केंद्र निवडण्याची तारीख 31 मार्चपर्यंत वाढवली आहे. शिवाय आता मराठवाड्यात नांदेडमध्ये एक अतिरिक्त केंद्र देण्यात आलं आहे. राज्यातील एकूण केंद्रांची संख्या आता 11 झाली आहे. विद्यार्थ्यांना आपल्या जवळचं परीक्षा केंद्र निवडण्यासाठी 24 ते 27 मार्च हा कालावधी देण्यात आला होता. मात्र आणखी एका केंद्राची भर पडल्याने तारीख वाढवण्यात आली आहे. मराठवाड्यात आता दोन केंद्र झाले आहेत. यापूर्वी औरंगाबाद हे केंद्र होतं. केंद्राने यापूर्वी राज्यात चार नव्या केंद्रांना मंजुरी दिली होती. अहमदनगर, अमरावती, सातारा आणि कोल्हापूर या चार जिल्हांमध्ये अतिरिक्त केंद्र सुरु करण्यात आली आहेत. नीटसाठी राज्यात आतापर्यंत नागपूर, नाशिक, ठाणे, मुंबई, पुणे आणि औरंगाबाद अशी केवळ सहाच केंद्र होती. आता त्यात पाच अतिरिक्त केंद्रांची भर पडल्याने ही संख्या 11 वर पोहोचली आहे. यापूर्वी केंद्रांना मंजुरी देण्यात आली तेव्हा मराठवाड्यात एकही नवीन केंद्र मिळालेलं नव्हतं. त्यामुळे मराठवाड्याला आणखी एक केंद्र द्यावं, अशी मागणी करण्यात आली होती. यापूर्वी नीट परीक्षा 80 शहरांमध्ये घेतली जात असे. पण आता 24 नव्या केंद्रामुळे 2017 ची नीट परीक्षा 104 शहरांमध्ये होणार आहे. या शहरात नीटचे नवी केंद्र
  • महाराष्ट्र - नांदेड
  • आंध्र प्रदेश – गुंटूर
  • आंध्र प्रदेश – तिरुपती
  • गुजरात – आणंद
  • गुजरात – भावनगर
  • गुजरात – गांधीनगर
  • कर्नाटक – दावणगिरी
  • कर्नाटक – हुबळी
  • कर्नाटक – म्हैसूर
  • कर्नाटक – उडपी
  • केरळ – कन्नूर
  • केरळ – थ्रिसूर
  • महाराष्ट्र – अहमदनगर
  • महाराष्ट्र – अमरावती
  • महाराष्ट्र – कोल्हापूर
  • महाराष्ट्र – सातारा
  • पंजाब – अमृतसर
  • राजस्थान – जोधपूर
  • तामिळनाडू – नमक्कल
  • तामिळनाडू – तिरुनेलवेली
  • तामिळनाडू – वेल्लोर
  • उत्तर प्रदेश – गोरखपूर
  • पश्चिम बंगाल – हावडा
  • पश्चिम बंगाल – खरगपूर

संबंधित बातम्या :

नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रात चार नवी केंद्र

‘नीट’साठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढवणार, सुत्रांची माहिती