राष्ट्रवादी काँग्रेसने हाकललेले कर्तव्यनिष्ठ आयएएस अधिकारी
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2016 03:18 PM (IST)
नवी मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसने परंपरेप्रमाणे आणखी एका प्रामाणिक अधिकाऱ्याला रस्ता दाखवला. आज नवी मुंबई पालिकेत सभागृह नेते जयवंत सुतार यांनी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडला. हा प्रस्ताव 104 विरुद्ध 6 मतांनी पारीत झाला. तुकाराम मुंढेंवर नाराजीची कारणं तुकाराम मुंढे यांनी नवी मुंबईचा कारभार हातात घेतल्यापासून भ्रष्टाचाऱ्यांचं धाबे दणाणले होते. महापालिकेने मोरबे धरणाजवळ 163 कोटी खर्चून सोलार प्रोजेक्ट उभारण्याची तयारी केली होती. या प्रकल्पाच्या पुढील 25 वर्षांच्या देखभालीचा खर्च 125 कोटी रुपयांवर जाणार होता. प्रकल्पातून तयार होणाऱ्या वीजेचा प्रतियुनिट खर्च 8 रुपये 50 पैसे इतका होता.इतक्या महाग वीजेला मार्केटमध्ये कुणीही खरेदीदार मिळणार नाही. त्यामुळे मुंढेंनी हा प्रस्ताव फेटाळला.