पुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2016 10:50 AM (IST)
पुणे: एका प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. आज पहाटे कासारवाडी ते पिंपरी दरम्यान ही घटना घडली. 25 वर्षीय मुलगा नवी मुंबईतील खारघरचा, तर 18 वर्षाची तरुणी पिंपरी चिंचवडची राहणारी होती. हे दोघेही बेपत्ता होते. दोघांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये दाखल केल्या होत्या. मात्र दोघांनीही आत्महत्या केल्याचं आज उघड झालं आहे. तरुणी बीसीएचं शिक्षण घेत होती. दोन दिवसांपासून हे दोघे बेपत्ता होते. मुलीच्या घरच्यांनी तिचा शोध घेतला परंतु ती मिळून न आल्याने काल रात्री अकराच्या सुमारास निगडी पोलीस ठाण्यात बेप्पता असल्याची तक्रार दिली होती. तर मुलाच्या कुटुंबीयांनी खारघर पोलीस ठाण्यात बेप्पता असल्याची तक्रार नोंदवली होती.