पुणे : पुण्यामध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 18 वर पोहोचली आहे. एका कोरोना संशयित व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 17 मार्चला या व्यक्तीची कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. नेदरलॅंड आणि फ्रान्सहूनही व्यक्ती जाऊन आली होती.


नेदरलॅंड आणि फ्रान्सहून प्रवास करून आलेली पुण्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 गेली आहे. ही महिला 15 मार्चला पुण्यात पोहचली आणि 17 मार्चला तपासणी झाली असता तीला नायडू हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. काल रात्री उशीरा तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पुणेकरांना करण्यात आलं आहे. याशिवाय पुण्यात आजपासून मॉलमधील फक्त जीवनावश्यक वस्तूंचीच दुकानंच सुरु राहणार आहेत. तर 31 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद राहणार असल्याचं विभागीय आयुक्तांनी सांगितलं आहे.


देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 138वर पोहोचली आहे. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोविड-19 मुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 137 कोरोनाबाधित असून त्यापैकी 24 एनआरआय आहेत.


राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती




  • पुणे - 8

  • पिंपरी-चिंचवड - 10

  • मुंबई - 7

  • नागपूर - 4

  • यवतमाळ - 3

  • कल्याण - 3

  • नवी मुंबई - 3

  • रायगड - 1

  • ठाणे - 1

  • अहमदनगर - 1

  • औरंगाबाद - 1


भारतात आतापर्यंत तीन लोकांचा मृत्यू

मुंबईमध्ये दुबईमधून परतलेल्या एका 64 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीचा काल मृत्यू झाला आहे. याआधी मागील मंगळवारी कुलबर्गी येथील 76 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून हा रूग्ण सौदी अरबमधून परतला होता. तसेच दिल्लीतील कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या 68 वर्षीय महिलेलाही आपले प्राण गमवावे लागले आहेत. याव्यतिरिक्त कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या 57 हजार लोकांवर लक्ष ठेवलं जात आहे.


Juhu Chowpatty Closed | कोरोनामुळे मुंबईतील जुहू चौपाटीवर जमावबंदी लागू, 31 मार्चपर्यंत चौपाटी बंद



संबंधित बातम्या :


Coronavirus | एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका, एकाच दिवशी दीड कोटींचं नुकसान


Coronavirus | तुमच्या घरी येणाऱ्या न्यूजपेपरवर कोरोना व्हायरस तर नाही?

Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्देश असतानाही अनावश्यक याचिका सादर, हायकोर्टाकडून 15 हजारांचा दंड