पिंपरी : पुण्याजवळील देहूगावच्या विठ्ठलवाडीत एका दीड वर्षीय चिमुकल्याचा पाणी म्हणून डिझेल प्यायल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. वेदांत गौतम गायकवाड अस मृत्यू झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे.


गरिबी असल्याने घरात आई स्टोव्ह पेटवण्यासाठी डिझेलचा वापर करत होती. खेळता खेळता वेदांतने पाणी म्हणून डिझेल प्यायला. डिझेल प्यायले गेल्याने त्याची प्रकृती बिघडली. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

आईकडून स्टोव्हमध्ये डिझेल टाकून झाल्यानंतर डिझेलची बाटली जमिनीवर पडली होती. वेदांत घरात खेळत होता, खेळता खेळता त्याने पाणी समजून डिझेल प्यायले. त्यानंतर लगेचच तो उलटी करू लागला त्याचे डोळेही पांढरे झाले. वेदांतच्या आईला ही बाब लक्षात आली.

वेदांतच्या आईने तातडीने त्याला खासगी रूग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार सुरू झाले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वेदांतचे आई वडील दोघेही मजुरी करतात.