मुंबईविरोधकांना शेतकऱ्यांचं काही देणेघेणं नाही, काय दिले त्याचा हिशोब द्यायचा होता, आकडे आमच्याकडे आहेत. त्यामुळे शेतकरी कोमात आहे, अशा भाषा योग्य नाही, हा शेतकऱ्यांचा अपमान आहे. आम्ही शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, तुम्ही तोंडाला पाने पुसली, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी शिंदे यांनी विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 


एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यावरून चौफेर टीका होत असल्याने  सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, तुम्ही 50 हजार दिले नाही, आम्ही खात्यावर जमा केले, तुम्ही केवळ पोकळ घोषणा केल्या. आमचं काम भरीव आहे


शेतकरी नव्हे तर विरोधी पक्ष कोमात गेले की काय?


त्यांनी सांगितले की, सरकार गेलं हे मान्य करायलाच तयार नाहीत. त्यामुळे वस्तुस्थिती मान्य करा. सरकार वेगाने काम करत आहे, कळतंय पण वळत नाही अशी स्थिती आहे. नागपूर अधिवेशन असताना मी व देवेंद्र फडणवीस स्वतः माती व चिखल तुडवत गेलो. शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का? असे प्रश्न कुणी मांडले होते. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न कळणार का? शेतकऱ्यांना योजना लागू केल्या आहेत. 29 हजार 520 कोटी रुपये शेतकऱ्यांचा खात्यात जमा केले आहेत. 12 हजार रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी वर्षाला मिळत आहेत. 88 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे. एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो, खोटं बोलत नाही, दिलेला शब्द पाळतो. इथं व केंद्रात आमचे सरकार आहे.डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना जबल आनंद मिळत आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी योजनांना चालना दिली आहे. 


नाना तुम्ही खासगीत सांगता की चांगलं काम झालं


शिंदे म्हणाले की, अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने सिंचन प्रकल्प बंद पाडले होते. आम्ही 131सिंचन प्रकल्पांना चालना दिली. चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. नाना (नाना पटोलेंना उद्देशून) तुम्ही खाजगीत सांगता की चांगल काम झालं. पक्ष चोरला हे रोज सुरु असून स्वार्थापायी विचार विकले याला काही अर्थ नाही. सारखं चोरलं म्हणण्यापेक्षा मर्दा प्रमाणे बोला की. खोके आम्हाला म्हणणारे त्यांनी खात्यातून 50 लाख रुपये चोरले. त्याची चौकशी सुरु आहे. खोके म्हणणारे आता कंटेनर आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या