मुंबई : राज्यावरील ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. आज एकाच दिवसात राज्यात ओमायक्रॉनच्या 238 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे. 


राज्यात सापडेलल्या रुग्णांपैकी 197 रुग्ण हे पुण्यातील  आहेत. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील 32, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन, मुंबई दोन, अकोल्यातील एक रुग्ण सापडला आहे. राज्यात आज  आढळलेल्या १६०५ रुग्णांपैकी ८५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.


राज्यात आज  43 हजार 211 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात आज 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे.  सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,15,64,070   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


महत्त्वाच्या बातम्या :