पुण्यात रिक्षाचालक आक्रमक, ओला कॅबची तोडफोड
एबीपी माझा वेब टीम | 31 Aug 2016 07:50 AM (IST)
पुणे : ओला-उबरविरोधात रिक्षाचालकांचं मुंबईत शांततेत आंदोलन सुरु असताना पुण्यातील आंदोलनाला काहीस गालबोट लागलं आहे. पुणे आरटीओसमोर रिक्षाचालकांच्या आंदोलनादरम्यान ओलाच्या 2-3 गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. आरटीओसमोर सुमारे 400 ते 450 रिक्षाचालकांचं आंदोलन सुरु आहे. आंदोलनात सहभागी असलेल्या रिक्षाचालकांनी सिग्नलजवळ उभ्या असलेल्या ओला-उबर कॅबची तोडफोड केली. रिक्षाचालकांनी ओला-उबर गाड्यांच्या काचेचा अक्षरशः चक्काचूर केला आहे.