झोप सहन न झाल्याने चालकाचं टँकरवरील नियंत्रण सुटून अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. अपघातानंतर चालक तिथून पसार झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावातील लोक अपघातस्थळी दाखल झाले. टँकरमधून तेल गळत असल्याचं पाहिल्यानंतर लोकांनी हंडे, किटल्या आणून तेल भरुन नेलं. काहींनी तर कॅनमधील दूध ओतून त्यात तेल भरुन नेलं.
दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी याठिकाणी धाव घेतली. पोलिस पोहोचल्यावर त्यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवलं.
पाहा व्हिडीओ