पिंपरी: पुण्यातल्या खेड न्यायालयानं अवघ्या 48 तासांत विनयभंगाच्या आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. यात 10 दिवसांच्या आत तक्रारीचा तपास पूर्ण करत चाकण पोलिसांनीही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


चाकणमध्ये एका कंपनीत काम करणाऱ्या महिलेला तेथील सुरक्षारक्षक अतुल पाटील फोन करुन त्रास देत होता. 28 डिसेंबर ते 1 जानेवारीच्या काळात त्यानं वेगवेगळ्या नंबरवरुन तिला त्रास दिला. अखेर संतापून महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली.

खेड पोलिसांनी तातडीनं तपास करत सुरक्षारक्षक अतुल पाटीलला अटक केली. अटक केल्यानंतर त्याच्याविरोधात चार्जशीट, साक्षीदार, पुरावे गोळा करुन 9 जानेवारीला खेड न्यायालयात हजर करण्यात आलं. 10 तारखेला न्यायालयानं त्याची तपासणी केली आणि आज आरोपी अतुलला दोन वर्षांची सक्त मजुरी आणि 500 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.