Pune News : पुणे (Pune) शहरातील युवासेनेचे (Pune Yuvasena) पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आदेशाने पुण्यात नव्या नियुक्त्या केल्या आहेत. मात्र सर्व नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱ्यांचे काम बघून कायम करण्यात येणार आहे. पुण्यातील काही युवा सेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने नवीन पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. शहर युवा अधिकारी, शहर समन्वयक, शहर चिटणीस, उपशहर युवा अधिकारी, विधानसभा युवा अधिकारी अशा वेगवेगळ्या पदावर अनेकांना संधी देण्यात आली आहेत.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फुट पाडल्यानंतर शिवसेनेने पुन्हा पक्षबांधणीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. युवासेनेत मोठ्या प्रमाणात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱ्याचे काम बघून त्या कायम करण्यात येतील, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
पद, पदाधिकाऱ्याचे नाव आणि कार्यक्षेत्र कोणतं?
शहर युवा अधिकारी जाहीर केले आहे. त्यात राम थरकुडे (कोथरूड, कसबा, शिवाजीनगर व खडकवासला विधानसभा), सनी गवते (वडगावशेरी, कॅण्टोन्मेंट, हडपसर व पर्वती विधानसभा), शहर समन्वयक : युवराज पारिख (कोथरूड, कसबा, शिवाजीनगर व. खडकवासला विधानसभा), प्रसाद बाबर (वडगावशेरी, कॅण्टोन्मेंट, हडपसर व पर्वती विधानसभा),शहर चिटणीस : निरंजन दाभेकर, अक्षय माळकर, उपशहर युवा अधिकारी : मयूर भांडे (शिवाजीनगर, कोथरूड), विकास बधे (कसबा, हडपसर), अक्षय फुलसुंदर (पर्वती, कॅण्टोन्मेंट), शिवप्रसाद जठार (वडगावशेरी, खडकवासला), उपशहर समन्वयक : आनंद भिलारे, मयूर पवार, परेश खांडके, कमलेश मानकर, चेतन चव्हाण, विधानसभा युवा अधिकारी: अमर कामठे (हडपसर विधानसभा), सोनू पाटील (वडगावशेरी विधानसभा), आकाश जगताप (कॅण्टोन्मेंट विधानसभा), शुभम दुगाणे (कसबा विधानसभा), गौरव पापळ (पर्वती विधानसभा), हर्षद मांजळकर (शिवाजीनगर विधानसभा),रुपेश थोपटे (खडकवासला विधानसभा), वैभव दिघे (कोथरूड विधानसभा) या सगळ्यांचा समावेश आहे.
युवासेना मजबूत करण्याची तयारी
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी युवासेना मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. तरुणांच्या प्रश्नांसाठी त्यांनी राज्यात अनेक शहरात दौरे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अनेक तरुण शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे युवासेना मजबूत करण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले. त्यांनी पुण्यात या कामाला जोरदार सुरुवात केली आहे.