नवी दिल्ली : तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या शिरपेचात एक नाही, दोन नाही तर तब्बल चार मानाचे तुरे खोवले गेलेयत. कारण, एनटी अॅवॉर्ड्स सोहळ्यात एबीपी माझाने मोठी बाजी मारलीय. एबीपी माझाच्या 'दहाच्या बातम्या' या बुलेटिनचाही गौरव करण्यात आलाय. दिवसभरातील बातम्यांचा सांगोपांग वृत्तांत मांडणाऱ्या दहाच्या बातम्या बुलेटिनला सर्वोत्तम दैनंदिन न्यूज बुलेटिनचा पुरस्कार मिळालाय. तर, राजकारण, समाजकारण, क्रीडा, विज्ञान, शिक्षण तसेच शेतीसह अनेक विषयांचा जिथं उहापोह होतो... त्या त्या क्षेत्रातील दिग्गजांच्या विचारांचं शिंपण जिथं होतं... ज्यातून अनेकांना प्रेरणा मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे जिथं अनेक मोठे गौप्यस्फोट झाल्यानंतर राज्याच्या राजकारणाला अनेकदा वेगळी दिशाही मिळालीय. त्या 'माझा कट्टा'वरही एनटी अॅवॉर्डचं शिक्कामोर्तब झालंय. माझा कट्टाला सर्वोत्तम टॉक शो म्हणून, एनटी अॅवॉर्ड्सचं कोंदण बहाल करण्यात आलंय. त्याचसोबत, महाराष्ट्राला दिशा देणाऱ्या, गती देणाऱ्या अनेक विचारांचं जिथं मंथन होतं, आणि सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राचं वर्तमान मांडत, भविष्याचा वेध जिथं घेतला जातो, त्या माझा महाराष्ट्र, माझं व्हिजनला वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमासाठी मानाचा पुरस्कार मिळालाय. तसेच, दिवसभर घडलेल्या राजकीय, सामाजिक आणि इतरही क्षेत्रांतील बातम्यांचा अष्टावधानी आढावा घेणाऱ्या, प्रत्येक बातमीच्या सर्व अंगांचा धांडोळा घेणाऱ्या स्पेशल रिपोर्ट बुलेटिनला बेस्ट प्राईम टाइम न्यूज शो विभागात पुरस्कार मिळालाय. एकूणच, तुम्हा प्रेक्षकांच्या पाठबळावरच एबीपी माझाने एनटी अॅवॉर्ड्समध्ये विजयी पताका फडकावलीय. त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे मन:पूर्वक आभार.
NT अवॉर्ड्समध्ये ABP न्यूजला 19 पुरस्कार
1. बेस्ट अँकर... रोमाना खान
2. बेस्ट व्हिडीओ एडिटर .. धर्मेंद्र पासवान
3. बेस्ट यंग प्रोफेशनल.. सिद्धी विशाल शर्मा
4. ABP Majha..best talk show For majha katta...
5. सास बहू साजिश - best entertainment talk show अवार्ड.
6. Abp Majha.. televised live initiative by a news channel... Majha Maharashtra Majha vision by ABP Manjha
7. ABP news - The best prime time news show..India chahta hai.
8. Best prime time news show Award goes to ABP Majha For special report
9. ABP news Sales and marketing,best marketing initiative from a News channel hindi... Holi camping
10. ABP news Sales and marketing... Best brand partnership on news television Ozone
11. Sales and marketing Best digital marketing campaign for a brand partnership Spotify
12. Best live reporting from the ground Abp news Kanjhwala case
13. Abp news Best investigation Ground report Kanjhwala case
14.
15. Best promo show packaging Red fort AR VR
16- Best promo campaign by a news channel Yeh khabar zarur dekhe
16. Best daily news bulletin 10achya baatmya Marathi Abp Majha
17. Best prime time news show Special report Abp manjha
18. Best news producer Mahakaal cooridor abp news
19. PERSONALITY AWARDS Hindi News Producer / Executive Producer Rashmi Nishad