मुंबई : विधीमंडळातील सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सदस्य निरर्हता दूर करणे विधेयकात सुधारणा करुन विधानसभेत विधेयक मंजूर झालं. विधानसभा आणि विधानपरिषदेतील मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार असून, त्यांना आता लाल दिव्याची गाडी आणि सरकारी बंगलाही मिळेल. राज्यमंत्र्यांना ज्या सरकारी सुविधा मिळतात, त्या सर्व सुविधा आता सत्ताधारी पक्षाच्या मुख्य प्रतोदांनाही मिळतील. विधीमंडळात सध्या कोण मुख्य प्रतोद आहेत?
  • भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद – आमदार राज पुरोहित
  • भाजपचे विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद – आमदार भाई गिरकर
  • शिवसेनेचे विधानसभेतील मुख्य प्रतोद – आमदार सुनील प्रभू
  • शिवसेनेच्या विधानुपरिषदेतील मुख्य प्रतोद – आमदार निलम गोऱ्हे
आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि गुजरात राज्यात अशाप्रकारे मुख्य प्रतोदांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आहे. आता महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाच्या प्रतोदांनाही राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे.