Maharashtra State Medical Teachers Association Agitation : महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेनं (Maharashtra State Medical Teachers Association) असहकार आंदोलन (Agitation) पुकारलं आहे. घंटानाद आंदोलन करत वैद्यकीय शिक्षक संघटनेनं शासनाचा निषेध व्यक्त केला आहे. 14 तारखेपर्यंत मागण्यांवर निर्णय नाही झाला तर राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. 


लातूर (Latur News) येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Vilasrao Deshmukh Government Medical College, Latur) शिक्षकांनी आज घंटा नाद आंदोलनाचं आयोजन केलं होतं. मागील अनेक दिवसांपासून विविध मागन्यासाठी ते आंदोलन करत आहेत. रोज काही काळ महाविद्यालयातील प्रांगणात एकत्र येत मागण्यांसाठी आंदोलन केलं जात आहे. मात्र सरकार त्याच्या मागण्यांची दखल घेत नाही. यामुळे आज लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र येत घंटा नाद आंदोलन करण्यात आलं आहे.  


महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या प्रमुख मागण्या कोणत्या? 



  • अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचं शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावं

  • विविध भत्ते 7व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) मिळावेत 

  • कंत्राटी नियुक्तीचा शासन आदेश रद्द करण्यात यावा 

  • नवीन वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात याव्यात 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी कँडल मार्च काढण्यात आला होता. दररोज धरणं आंदोलनं सुरु आहेच. येत्या काळात मागण्या मान्य नाही, झाल्यातर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेनं दिला आहे. 14 तारखेपर्यंत निर्णय नाही झाला तर राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात येईल, असंही संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha