पुणे: गर्दीच नसल्याने सभाच गुंडाळण्याची नामुष्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढावली. सदाशिव पेठेतील टिळक रोडच्या सभेकडे पुणेकरांनी पाठ फिरवल्याने, मुख्यमंत्र्यांना भाषण न करताच माघारी फिरावं लागलं.
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/832883656821719042
या सभेला गर्दी नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी समन्वयाचं कारण देत, सभा रद्द करत असल्याचं ट्विट केलं.
निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यांच्या अनेक सभांना गर्दी होत असताना, इकडे पुण्यात मात्र हे चित्र पाहायला मिळालं.
मुख्यमंत्री सभेसाठी आले, मात्र या सभेला अत्यंत तुरळक प्रतिसाद होता. दुपारच्या सभेसाठी मुख्यमंत्री येऊन 15 मिनिटे झाली, तरीही त्यांची सभा सुरु झाली नाही.
गर्दीच नसल्याने मुख्यमंत्री 15 मिनिटांपासून स्टेजवर गेले नाहीत. मुख्यमंत्री स्टेजच्या बाजूलाच खाली थांबले होते.
या सभेसाठी आणलेल्या असंख्य खुर्च्या तशाच रिकाम्या दिसत होत्या. मंचावर पालकमंत्री गिरीष बापट आणि भाजप शहर अध्यक्ष योगेश गोगावले होते. मात्र मुख्यमंत्री खालीच होते.
काही वेळ थांबूनही गर्दी होत नसल्याचं पाहून, मुख्यमंत्र्यांनी मंचावरच न जाता थेट पिंपरी-चिंचवडकडे कूच केली.
संबंधित बातम्या