जालना: राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याविरोधात आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणीकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक मतदानावेळी, जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील पाटोदा मतदान केंद्रावर सरकारी लवाजम्यासह प्रवेश केल्याचा आरोप आहे.
लोणीकरांनी मतदान चालू असताना भाजप उमेदवाराच्या पतीला घेऊन बूथमध्ये प्रवेश केला होता. यावेळी केंद्रावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्याला आक्षेप घेतला.
राष्ट्रवादीने याबाबत मतदान अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती, त्यानंतर निवडणूक मतदान केंद्र अध्यक्षांच्या फिर्यादीवरून, मंठा पोलीस ठाण्यात लोणीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.