लातूरमध्ये उपोषण करणाऱ्या महिलांना जाळण्याचा प्रयत्न
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 18 Feb 2017 12:59 PM (IST)
लातूर : लातूरच्या उदगीरमध्ये उपोषण करणाऱ्या महिलांना जाळण्याचा प्रयत्न झाला. उपजिल्हाधिकारी कार्यालयसमोर हा धक्कादायक प्रकार घडला. आंदोलक महिला रात्री झोपेत असताना त्यांच्या गाद्या आणि मंडप पेटवण्याचा प्रयत्न झाला. सिद्धार्थ इंडस्ट्रियल को-ऑप सोसायटी लिमिटेड या संस्थेविरोधात सविता बिराजदार यांच्या नेतृत्वात महिलांचं 15 दिवसांपासून आंदोलन सुरु होतं. संस्थेची नोंदणी रद्द करुन फसवणुकीचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी आंदोलक महिलांची आहे. मात्र असणाऱ्या आंदोलकांच्या गाद्या आणि मंडप रॉकेल टाकून पेटवण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, अज्ञातांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.