कोल्हापुरात दोन हजाराची नोट खपवण्यासाठी कसरत; सुट्टे नसल्याचे सांगत नोट घेण्यास टाळाटाळ!
2000 हजार रुपयांच्या बंदी आणल्याने 30 सप्टेंबरपर्यंत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनोटबंदीचा निर्णय आल्यानंतर ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांच्यासाठी डोकेदुखी सुरु झाली आहे.
नोट बदलण्यासाठी पुरेसा कालावधी असूनही नोट घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.
नोट नाकारताना सुट्टे नसल्याचे कारण कोल्हापुरात दिले जात आहे.
त्यामुळे ग्राहकांची दोन हजारच्या नोटेसाठी कसरत सुरु आहे.
पेट्रोल पंपावरही नोट घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.
नोट चलनातर राहणार असूनही नोट स्वीकारली जात नसल्याचे चित्र आहे.
बँकेत जाऊन नोटा बदलण्याची मूभा असतानाही काही जणांकडून व्यवहारात खपवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मात्र, नोट स्वीकारली जात नसल्याने उद्यापासून (22 मे) बँकेत गर्दी होण्याची शक्यता आहे.
एकावेळी 2 हजारांच्या 10 नोटा बदलता येणार आहेत.