Maharashtra Petrol-Diesel Price Today : सरकारी तेल कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. गेल्या 18 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये 10 रुपयांची वाढ झाली आहे. दरम्यान, देशात इंधन दरवाढीचं सत्र 24 मार्चपासून सुरु झालं होतं. महाराष्ट्रासह मुंबईतही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. परभणीत तर केवळ राज्यातीलच नाहीतर देशातील सर्वात महाग पेट्रोल दिसत आहे. जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय? 

देशातील सर्व राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रात शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. पुण्यात पेट्रोलचे दर 120.60 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 103.28  रुपये प्रति लिटर झालं आहे. तर नाशकात पेट्रोलचे दर 120.02 रुपये प्रति लिटर आणि डिझेलच्या किमती 102.73 रुपये प्रति लिटर झालं आहे. नागपुरात शुक्रवारी पेट्रोलचे दर 121.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 103.73 रुपयांवर पोहोचले आहेत. कोल्हापूरमध्ये पेट्रोलचे दर 120.64 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 103.35 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. 

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील दर 

शहरं पेट्रोलचे दर (प्रति लिटर) डिझेलचे दर (प्रति लिटर)
मुंबई 120.51 रुपये 104.77 रुपये
पुणे 120.60 रुपये 103.28 रुपये
नाशिक 120.02 रुपये  102.73 रुपये 
परभणी 123.51 रुपये 106.08 रुपये
औरंगाबाद  120.63 रुपये  103.32 रुपये 
कोल्हापूर 120.64 रुपये 103.35 रुपये
नागपूर  121.03 रुपये 103.73 रुपये

दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Petrol-Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलचे दर उच्चांकी पातळीवर, एक लिटरसाठी किती पैसे मोजाल?