Nitin Raut On Arvind Kejriwal Note Statement: नोटेवर महात्मा गांधींसोबत गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापा, अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केंद्र सरकारला केली आहे. यानंतर सर्व स्तरांतून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावावा अशी मागणी केलीय.






नोटेवर महात्मा गांधींसोबत डॉ. बाबासाहेबांचा फोटो का नाही? असा सवाल ट्वीट करत नितीन राऊत यांनी केला आहे. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नोटांवर छापण्याची मागणी तशी जुनीच आहे. आंबेडकरी नेत्यांसह अनेक नेत्यांनी ही मागणी मागील अनेक वर्षांपासून लावून धरली आहे. 






काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटलं आहे की, गांधींना हटवणं हा संघाचा छुपा अजेंडा आहे. केजरीवाल त्या दिशेने काम करत आहेत. 


अशा गोष्टींनी रुपयाची घसरणारी किंमत सावरणार नाही


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर बोलताना म्हटलं आहे की, अशा गोष्टींनी रुपयाची घसरणारी किंमत सावरणार नाही. केजरीवाल यांनी असले धार्मिक द्वेषाचे अजेंडे राबवू नयेत. तर हुसेन दलवाई यांनी म्हटलं आहे की, लक्ष्मी, गणपती हे तर सगळ्यांचं आराध्य दैवत आहे, पण नोटेवर त्यांची काय गरज, असं दलवाई यांनी म्हटलं आहे. 


अरविंद केजरीवाल यांनी भारतीय चलनावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबतच श्रीगणेश आणि लक्ष्मीचं चित्रही हवं. इंडोनेशिया मुस्लिम देश तरी त्यांच्या चलनावर श्रीगणेशाचं चित्र आहे. भारतात याला कुणीही विरोध करणार नाही, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 


ही बातमी देखील वाचा- Arvind Kejriwal PC : चलनी नोटेवर महात्मा गांधी यांच्यासोबतच गणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा मुद्रित करा : अरविंद केजरीवाल