नागपूर : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्या मुलीचा विवाहसोहळा आज नागपुरात पार पडतोय. गडकरींची मुलगी केतकी अमेरिकेत फेसबूकमध्ये काम करणाऱ्या आदित्य कासखेडीकरसोबत विवाहबद्ध होणार आहे.



लग्नासाठी पोहोचलेले पाहुणे

केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, योगगुरु रामदेव बाबा, शिवसेना नेते रामदास कदम, आरएसएस प्रमुख मोहन भागवत, आरएसएस सरसहकार्यवाह सुरेश जी. सोनी, आसामचे राज्यपाल बनवारी लाल पुरोहित, केंद्रीय नगरविकास मंत्री वैंकय्या नायडू, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, दुग्धसंवर्धन मंत्री महादेव जानकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे नागपुरात दाखल झाले आहेत.

सकाळी 11 वाजेपर्यंत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह नागपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.



नागपूर-वर्धा रोडवरील दी एम्प्रेस पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा होत आहे. नितीन गडकरींचा जनसंपर्क हा मोठा असल्याने अनेक दिग्गज या विवाह सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.