नितीन गडकरी म्हणतात, ‘सरकार’ म्हणजे.....
एबीपी माझा वेब टीम | 12 Jun 2016 04:22 AM (IST)
सोलापूर : “चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान होत नाही आणि वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही, यालाच सरकार म्हणतात.” अशी कोटी नितीन गडकरी यांनी केली. पण हे आपल्या सरकारमध्ये नाही, अशी पुष्टी जोडायला ते विसरले नाही. ते सोलापुरात बोलत होते. जनता बँक सुवर्ण महोत्सवी वर्षापूर्ती कार्यक्रमासाठी ते सोलापुरात उपस्थित होते. यावेळी बोलताना गडकरी यांनी सरकार नावाच्या यंत्रणेवर उपहासात्मक विधान केलं. “उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च कमी झाला, तर औद्योगिक विकासाला चालना मिळू शकेल. त्यासाठी वाहतुकीच्या प्रचलित मार्गाऐवजी जलमार्गाचा अवलंब फायदेशीर ठरेल. देशात जलमार्ग विकसित करण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे. ग्राहकांना वाजवी दरात उत्पादित माल मिळण्यासाठी जलमार्ग वाहतुकीचा पर्याय योग्य आहे.”, अस मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.