Nitin Gadkari : 'पुणे-बंगळुरू यापुढे पाण्यात जाणार नाही', केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं आश्वासन
Continues below advertisement
कोल्हापूर : पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही याची खात्री देतो, असे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात दिले. पुणे-बंगळुरू महामार्गासाठी तब्बल 40 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यावेळी कोल्हापुरात महापुराचा एक थेंब महामार्गावर येणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कार्यक्रमात झालेल्या गर्दीवरही नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. एकाच मंडपात 100 लग्न व्हावी, अशी आज अवस्था झालीय. सगळेच आमदार, खासदार या कार्यक्रमाला उपस्थित आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील कामाबाबत एकच कार्यक्रम होत असल्याने गर्दी उसळल्याचे गडकरी म्हणाले.
Continues below advertisement