Nitesh Rane on Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सलाईनमधून विष देण्याचा आणि माझं एन्काऊंटर करण्याचा फडणवीसांचा डाव होता, माझा बळी घ्यायचा तर सागर बंगल्यावर घ्या, मी आता सागर बंगल्यावर येतो, मला गोळ्या घाला, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  


नितेश राणे म्हणाले की, मला आता प्रश्न पडायला लागला आहे की आता यांना नेमके मराठा समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत की फडणवीस साहेबांच्या नावाने राजकारण करायचे आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण (Maratha Reservation) मिळाले आहे. आणि आता पुढे कोर्टाची जी लढाई लढली जाणार आहे. त्यासाठी सर्वात मोठा आधार हा फडणवीस साहेबांचाच मिळणार आहे. जो या अगोदर देखील मिळाला होता. तर मला विचारायचे आहे की, यांची स्क्रिप्ट देतय कोन?  या मागची पार्श्वभूमीवर काय आहे? नेमके काय केले आहे फडणवीस साहेबांनी, असे त्यांनी म्हटले आहे. 


जरांगेंच्या स्क्रिप्ट मागे नक्की कोण आहे?


त्यांना जर का असे वाटते की ते सागर बंगल्यापर्यंत येतील आणि आम्ही सगळे जण काय गप्प बसणार का? आम्ही पण मराठे आहोत. त्यांना पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत आहोत की राजकारण करू नका.  उठ सूट फडणवीस साहेबांच्या नावाने टीका करायची, राजकारण करायचे, धमक्या द्यायच्या.  एकाच नेत्यावर टीका का होत आहे. शरद पवारांवर, उद्धव ठाकरेंवर टीका का होत नाही. सगळे सोडून त्यांना फक्त एकच नेता दिसत आहे, त्यामुळे  या स्क्रिप्ट मागे नक्की कोण आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.  


मगच सागर बंगल्यावर येण्याचा विचार करा


मागील आठवड्यात जरांगे यांच्यावर काही नेत्यांनी आरोप केले. हे सर्व षड्यंत्र देवेंद्र फडणवीस यांचे च असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. याबाबत नितेश राणे म्हणाले की, मला आश्चर्य असे वाटते की, जे लोक बोलत आहेत ते जरांगेंचे जुने सहकारीच आहेत. आता त्यांना जरांगेंच्या आंदोलनात प्रामाणिकपणा दिसत नसेल  तर यात फडणवीस साहेबांची चूक कुठून आली? तुम्ही तुमची माणसे सांभाळा. या टीका आम्ही सहन करणार नाही. सागर बंगल्याच्या आधी एक भिंत लागलेली आहे. ती आमच्या लोकांची आहे. ती पहिली पार पाडा आणि मग सागर बंगल्यावर येण्याचा विचार करा, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Manoj jarange Patil : मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करण्याची भूमिका