मुंबई : वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात शुक्रवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पहिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये नारायण राणे यांनी त्यांच्या पक्षातील लोकसभेच्या पाहिल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघामधून उमेदवारी देण्यात आली आहे.

नारायण राणे यावेळी म्हणाले की, "देशावर इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे, परंतु शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांना युतीची चिंता आहे." यांना फक्त सत्ता हवी आहे. दरम्यान राणे यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

मुंबईतला मराठी टक्का कमी होत आहे, याबाबत राणे यांना विचारल्यावर राणे म्हणाले की, "शिवसेना भाजप पक्षांची मुंबईत सत्ता आहे. उद्धव ठाकरे गेली 52 वर्षे मुंबईवर मुंबईवर राज्य करत आहेत. त्यांनी मुंबईकरांना फसवलं आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांनी 9 दिवस संप केला. परंतु उद्धव ठाकरेंना त्याची चिंता वाटली नाही. मुंबईतली मराठी माणसांची संख्या कमी होण्यास शिवसेनाच जबाबदार आहे."

ह्यांना युतीची पडलेली आपल्याला पाहायला मिळाली ह्यांना फक्त सत्ता हवी आहे नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे वर टीका करत असतात उद्धव ठाकरे यांनी गेले 52 वर्ष ज्या मुंबईवर राज्य केले त्या मुबाईकरणा फसवलं त्यामुळेच बेस्टच संप 9 दिवस सुरू असताना उद्धव ठाकरे यांना त्याची चिंता वाटली नाही मराठीचा मुंबईतला टक्का कमी करण्यासाठी जबाबदार शिवसेना आहे.