मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु आहेत. ही सगळी चर्चा सुरु असताना भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांचे सुपुत्र निलेश राणे (Nilesh Rane) शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. नारायण राणे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा बंगल्यावरील भेटीनं या चर्चाना उधाण आले हे.  तर निलेश राणे पक्षात आल्यास सेनेची ताकद त्यांच्या मागे उभी करणार, अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी (Uday Samant) दिली आहे. त्या पाठोपाठ आता राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यावर प्रतिक्रिया देत आपले मत व्यक्त केले आहे. 


निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे. मात्र युतीमध्ये एकमेकाचे उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. आमची युती एवढी घट्ट आहे की यात एकमेकाचे उमेदवार बदलले जातील, अशी रोखठोक भूमिकाही मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. 


निलेश राणे शिवसेनेत आले तर....  


कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात निलेश राणे हे उमेदवार असतील. मात्र कोणत्या पक्षातून असतील हे स्पष्ट नाही. यावर बोलताना दीपक केसरकर यांनी निलेश राणे शिवसेनेत आले तर स्वागतच आहे. मात्र युतीमध्ये एकमेकाचे उमेदवार बदलून देण्याची प्रथा आहे. पालघर मध्ये असं करण्यात आले होते. आमची युती एवढी घट्ट आहे की, यात एकमेकाचे उमेदवार बदलले जातील. असेही ते म्हणाले. कंत्राटदारांची 40 हजार कोटींची रक्कम थकीत आहे. यावर बोलताना  दीपक केसरकर यांनी ज्या कंत्राटदारांचे पैसे थकीत आहेत, त्यांनी त्या त्या खात्याशी संलग्न होऊन माहिती दिली तर त्यांना ते देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केलंय.  


शिंदेंची शिवसेना जागा सोडणार? 


निलेश राणे यांनी विधानसभा लढवण्याबाबत दुजोरा तर दिला. पण, मतदारसंघाचं नाव मात्र घेतलं नाही. पण, त्यानंतर देखील मिळत असलेल्या माहितीनुसार निलेश राणे कुडाळ - मालवणमधून लढणार असल्याचं बोललं जात आहे. पण, सध्या या ठिकाणी शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे जागावाटपाच्या प्राथमिक सुत्रानुसार ही जागा शिंदे गट भाजपला सोडणार का? हे देखील पाहावं लागेल. त्यानंतरच निलेश राणे यांचा पुढील मार्ग मोकळा होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या