NIA Raid : अमरावती (Amravati ), भिवंडी (Bhiwandi), छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhajinagar) 17 शहरांमध्ये एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेने छापे (NIA Raid) टाकलेत. एनआयने अमरावतीच्या छायानगर मधून एकाला आणि भिवंडीच्या खोणी खार पाडीमधून दोघेजण ताब्यात घेण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेले 3 तरुण पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. 


अधिकची माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या बीड (Beed) बायपास भागात असलेल्या एनआयए ने 22 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलंय. भिवंडीतील खोणी खार पाड ग्रामपंचायत परिसरातून 45 वर्षीय कामरान अन्सारीला ताब्यात घेण्यात आलंय. याशिवाय अमरावतीतील छायानगरमधून 35 वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या एनआयएकडून तिघांची कसून चौकशी सुरु आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांचा देशविरोधी कारवाया करणाऱ्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याचा संशय आहे. वर्षभरात एनआयएने केलेली ही तिसरी मोठी कारवाई आहे. 


भिवंडी शहरालगतच्या खोणी - खाडीपार ग्रामपंचायत परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ची पहाटेच्या सुमारास कारवाई करण्यात आली. या या कार्यवाहीत सापळा रचून एका इसमाला ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव कामरान अन्सारी वय 45 असे आहे . पाकिस्तान मध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशया वरून कामरान याला NIA ने ताब्यात घेतले आहे. 


कामरान अन्सारी हा खाडीपार परिसरात असलेल्या डोंगरकर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर कुटुंबासह राहत होता. कामरान हा मूळ मालेगावचा रहिवासी असून तो कल्याण मधील एका खाजगी कंपनीत काम देखील करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर   मुस्लिम धर्मीयांच्या जमात मध्ये नेहमी हजेरी लावत असायचा तसेच कामरालला कम्प्युटरचा चांगलं नॉलेज होतं. परंतु कामरान याचा पाकिस्तानमध्ये देश विरोधी संघटनेची संवाद होत असल्याच्या संशयावरून कमरानला NIA ने ताब्यात घेतले आहे. मात्र कामरान यांनी आपल्या ग्रुपमध्ये किती जणांना जोडले आहे तसेच कोण कोणत्या देश विरोधी संघटनेची संबंध आहे. कोणकोणत्या हालचाली चालू होत्या व काय प्लान आखला जात होता या संपूर्ण घटनेची चौकशी सध्या NIA ची टीम करीत आहे. 


भिवंडीत एनआयने पहाटेच्या सुमारास कारवाई केली. खोणी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. डोंगरकर नावाच्या इमारतीमध्ये जात ही कारवाई करण्यात आली आहे. कामरान अन्सारी याचा पाकिस्तानशी संपर्क असल्याचं सांगितलं जात होतं. त्यानंतर ही त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ही कारवाई संशयाच्या कारणाने करण्यात आलेली आहे. 


NIA च्या टीमने आज सकाळी 4 वाजता अमरावती मधून एका युवकाला छाया नगर मधून ताब्यात घेतले.. ताब्यात घेतलेल्या युवकाचं नाव मोहम्मद मुसेब शेख इसा असून त्याचं वय 23 वर्ष आहे.. सध्या अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये त्या युवकाची NIA टीम चौकशी करत आहे... मिळालेल्या माहिती नुसार हा अमरावतीचा युवक पाकिस्तान मधील संघटनेच्या संपर्कात असल्याचं कळत आहे...


ताब्यात घेतलेल्या मोहम्मद मुसेब शेख इसा याच्या आईने एबीपी माझाशी बोलतांना सांगितले की, सकाळी 4 वाजता अधिकारी घरी आले माझ्या मुलाची चौकशी केली काही कागदपत्रे सोबत घेतले. घरातील आणि दोन तीन तासात चौकशी करून सोडून देऊ असे सांगितले पण अजूनही सोडले नाही.. त्याला लवकरात लवकर सोडावे त्याची प्रकृती चांगली नाहीये, अशी माहिती मोहम्मद मुसेब शेख इसा याच्या आईने दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Kurla BEST Bus Accident : माझी आई रक्ताच्या थारोळ्यात अन् तो सोन्याच्या बांगड्या काढतोय, लाज नाही वाटली? कुर्ल्याच्या VIDEO नंतर फातिमा कणीस यांच्या मुलीचा टाहो