नवी मुंबईः मराठवाड्यानंतर मराठा समाजाचा मूक मोर्चा मुंबईच्या उंबरठ्यावर आला आहे. आज नवी मुंबई मराठा समाजाच्या वतीने भव्य मूकमोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला रायगड आणि नवी मुंबई परिरसरातून मोठ्या प्रमाणात महिला, तरुण आणि मुलींची हजेरी होती. कोपर्डी बलात्कार घटनेच्या निषेधार्थ राज्यात मराठा समाजाच्या वतीने मोर्चे काढले जात आहे. यापूर्वी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोर्चे काढण्यात आले आहेत. आज नवी मुंबईत पाऊस असूनही मोर्चाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नवी मुंबईनंतर आता दिवाळीच्या आधी मुंबईतही भव्य मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी दादरच्या शिवाजी मंदिरात काल बैठकही घेण्यात आली.