मुंबईः राज्यात वर्षभरात 17 हजार बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला आहे, अशी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल झाली आहे. हायकोर्टानेही सुनावणी देताना कुपोषणामुळे होणारे मृत्यू गंभीर असल्याचं निरीक्षण नोंदवत सरकारला जोरदार खडसावलं आहे. कुपोषणासंदर्भात हायकोर्टात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी सुरु आहे.


कुपोषण रोखण्यासाठी सरकारकडून मिळणारं अनुदान नेमकं कुठं जात. अनुदान वाटपाची पद्धत कशी आहे, असे सवाल हायकोर्टाने स्थानिक प्रशासनाला केले आहेत. पुढील सुनावणीवेळी सर्व तपशील हायकोर्टासमोर सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातल्या सागर वाघ या बालकाचा कुपोषणाने मृत्यू झाला. इतकंच नाही तर कुपोषण आणि इतर कारणांमुळे एकट्या पालघर जिल्ह्यात 600 जणांचा मृत्यू झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.