New Education Policy :  महाराष्ट्रामध्ये यावर्षीच्या पदवी प्रथम वर्षापासून नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून बीए बी कॉम आणि बीएससीच्या प्रथम वर्षापासून विद्यार्थ्यांना मल्टिपल चॉईसेस मिळणार आहे. भारतीय तत्त्वज्ञान भारतीय नीतिमत्ता भारतीय अर्थशास्त्र, परंपरा यासोबतच बाजाराला गरज असलेले अभ्यासक्रम विद्यापीठात पहिल्यांदाच प्रत्यक्ष राबविण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठांचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 


तसेच पहिल्यांदाच इंडस्ट्री मध्ये काम करणारे आणि ज्यांना 25 वर्षाचा अनुभव आहे, असे तज्ज्ञ प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात शिकवायला येतील. बाजाराची गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना रोजगार तरी मिळेल किंवा स्वयंरोजगार तरी करता येईल अशा पद्धतीच्या अभ्यासक्रमाची निर्मिती अंतिम टप्प्यात आहे. एका महिन्यामध्ये हा अभ्यासक्रम तयार होऊन संपूर्ण विद्यापीठांमध्ये एकाच वेळेला हा अभ्यासक्रम लागू होईल. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठांमध्ये एकच अकॅडमी वर्ष आणि तेही कॅलेंडर वर्षात पूर्ण होईल, अशा पद्धतीची रचना या अभ्यासक्रमाची असणार आहे.


प्राध्यापकांचे ट्रेनिंग सुरू


अनेकदा पहिल्याच वर्षी विद्यार्थी आपल्याला हे झेपत नाही, असं समजून किंवा आपली आवड नाही, असं समजून जर पहिल्याच वर्षी दुसऱ्या अभ्यासक्रमाला गेला. तर त्याला पहिल्या वर्षासाठी सर्टिफिकेट दुसऱ्या वर्षासाठी पदविका आणि तिसऱ्या वर्षासाठी पदवीच प्रमाणपत्र मिळेल. साधारण 2027 पर्यंत चार वर्षाचा अभ्यासक्रम लागू होईल. महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना मुख्य विषयाबरोबरच इतर विषयासाठी सुद्धा प्रवेश घेता येईल.


क्रेडिट गुण असतील


सदर अभ्यासक्रम लागू झाल्यानंतर 50 टक्के महत्व हे मूळ विषयाला राहील, त्यानंतर 50 टक्के महत्व हे वेटेज हे भारतीय मूल्य संस्कृती स्कील सामाजिक शास्त्र विकास या विषयाला राहील यातील. कुठली तरी एक स्कील शिकावी लागेल. या नव्या अभ्यासक्रमामुळे कुठल्याही प्राध्यापकाची नोकरी जाणार नाही. परंतु प्राध्यापकांना नवीन स्किल आत्मसात कराव्या लागतील. प्राध्यापकांचा काही प्रमाणात वर्कलोड वाढू शकतो, कमीही होऊ शकतो. महाविद्यालयांच्या वेळा ठरवून घेतल्या जातील. शिवाय अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांना कंपल्सरी महाविद्यालयात येण्याची गरज नसणार आहे. 


कर्नाटक उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रामध्ये नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.  ज्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना हवा तो अभ्यासक्रम नाही, तशा महाविद्यालयात विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयामध्ये शिकता येईल. शिवाय एका विद्यापीठातला विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठात जाऊन शिक्षण घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेऊन स्किल मिळवण्याची संधी मिळणार आहे. त्यानुसार नव्या अभ्यासक्रमासाठी प्राध्यापक, महाविद्यालय तयार आहेत का? नव्या अभ्यासक्रमामुळे फीस वाढेल का? प्राध्यापकांचा परफॉर्मन्स आणि पगार यांचा संबंध जोडला जाणार आहे का? महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनाही शहरी भागासारखं शिक्षण मिळेल का? महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठ एकाच पातळीवर येतील का? याबाबत डॉ. नितीन करमळकर यांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्टीकरण दिले आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI