अहमदनगरमध्ये 22 वर्षीय तरुणीवर गँगरेप, एकाला अटक
एबीपी माझा वेब टीम | 21 Aug 2016 02:26 AM (IST)
अहमदनगरः नोकरीचं आमीष दाखवून तरुणीचं वारंवार लैंगिक शोषण केल्याची घटना अहमदनगरमधील राहुरी तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी विलास वरपे या तरुणाला अटक करण्यात आली आहे. बँकेत नोकरीचं अमीष दाखवून विलासने जुलै ते ऑगस्ट महिन्यात नगर, राहुरी आणि पुणे जिल्ह्यात तरुणीला लॉजवर नेऊन अत्याचार केला. त्याचबरोबर शनिवारी राहुरी तालुक्यात डोंगरावर झाडीत नेऊन विलास वरपेसह इतर तिघांनी सामुहिक बलात्कार केल्याची पीडितेने तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी तरुणीचा मोबाईल हिसकावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री उशीरा राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उर्वरित दोन आरोपींचा शोध घेत आहेत.