बीड : पत्नीनं मांसाहारी जेवण बनवण्यास नकार दिला म्हणून पतीनं स्वतःला पेटवून घेतल्याचा  धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. धर्मराज कोरडे असं या टोकाचं पाऊल उचलणाऱ्या पतीचं नाव आहे.


 

श्रावण महिना सुरु असल्यामुळे  मांसाहारी जेवण बनवणार नसल्याचं धर्मराजच्या पत्नीनं त्याला सांगितलं. नकार ऐकून त्याने पत्नीला मारहाण करायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेली पत्नी शेजारच्या घरात लपून बसली.

 
संतापलेल्या धर्मराजने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतलं. पेटवून घेतल्यानंतर तो ओरडत बाहेर आला. शेजाऱ्यांनी आग विझवून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.

 

धर्मराज गेवराई तालुक्यातील राक्षसभुवनमधला रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर गेवराईतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तो 60 टक्के भाजल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.