जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूरचे भाजप आमदार नारायण कुचे यांचा भाचा असलेल्या दीपक डोंगरे यावर जालना जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान या कारवाई मागे मामा आमदार नारायण कुचे याचा हात असून यांच्यावर डोंगरे याने गंभीर आरोप केले आहेत. आमदार नारायण कुचे यांनी आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असून आपल्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याला सर्वस्वी मामा आमदार नारायण कुचे जबाबदार असतील असे म्हटलं आहे.
दरम्यान आमदार कुचे यांनी पोलीस उपअधीक्षक आणि SDM वर दबाव टाकून माझ्या विरुद्ध तडीपरीची नोटीस काढली आहे. माझ्या तडीपारीसाठी SDM ला मंत्रालयातून फोनाफानी झाल्याचा आरोप देखील त्याने केला आहे. मामाने विधानसभा निवडणुकीसाठी आपल्याकडून 40 लाख रुपये घेतले असून ते परत केले नसल्याचे सांगत मामा आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील त्याने म्हटलं आहे.
दीपक डोंगरेवर दाखल असलेले गुन्हे
- 2013- एकाला घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा, तालुका पोलीस ठाण्यात नोंद आहे.
- 2018- एका महिला कॉन्स्टेबलला छेडछाड करून तिचा विनयभंग केल्याचा कलम 354 गुन्हा कदीम जालना पोलीस ठाण्यात दाखल आहे.
- 2018- घरात घुसून मारहाण केल्याचा आरोपावरून शहरातील चंदनजीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
- 2000- साली एका मुलीच्या विनायभांगाचा जिल्ह्यातील बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील आरोपीवर आहे.
- 2000- सालीच व्हॉट्सअॅपवर मुलीची बदनामी करून तिच्या चारित्र्यविषयक अपमान वाटेल अशी टिप्पणी केल्याने माहिती तंत्रज्ञान कायद्यांन्वये बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.