Mumbai School Reopen : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी मुंबई महानगरपालिकेने सर्व शाळा पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास दिली आहे. 2 मार्चपासून मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा कोविड-19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पूर्णवेळ व पूर्णक्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु होणार आहेत. यासंदर्भात परिपत्रक बीएमसीकडून जारी करण्यात आले आहे.
परिपत्रकात पालिकेने म्हटले आहे की, सर्व बोर्डच्या सर्व माध्यमाच्या नगरबाहय विभागाच्या सर्व शाळा तसेच विशेष आणि दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व शाळा, मैदानी खेळ आणि शाळेचे विविध शैक्षणिक उपक्रम यासह पूर्णवेळ आणि पूर्ण क्षमतेने सुरु करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पूर्व प्राथमिक ते 12 वी पर्यंतच्या सर्व शाळा पूर्ण वेळ आणि पूर्ण क्षमतेने ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात याव्यात.
मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नाही
विद्यार्थ्यांना शालेय परिसरात मास्क वापरणे बंधनकारक असेल परंतु मैदानी खेळ, शारीरिक कवायतींसाठी मास्क बंधनकारक नसेल. कोविड 19 पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांना मधली सुट्टी असेल तसेच विद्यार्थ्यांना सुट्टीत पूर्वीप्रमाणे आहार घेण्यास परवानगी असेल, असं परिपत्रकात म्हटलं आहे.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती आवश्यक
पालिकेनं म्हटलं आहे की, विद्यार्थी शाळेत प्रवेश करताना त्यांचे तापमान तपासणी करण्यात यावी. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती 100% असणे आवश्यक आहे. कोरोना पूर्वीच्या वेळापत्रकानुसार शाळांच्या नियमित वर्गाच्या सामामध्ये मैदानी खेळ शालेय कवायती तसेच विविध सहशालेय शैक्षणिक उपक्रम घेण्यात यावेत. या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास प्रवृत्त करावे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Sanjay Raut : मराठीची आर्थिक कोंडी करायची अन् कार्यक्रम घेऊन ढोंग करायचे : संजय राऊतांचा भाजपवर आरोप
- Bajarang Sonwane : सांगा बजरंग बप्पाचे चुकले काय? बीडमध्ये राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीवर सोनवणे समर्थक नाराज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha