Shivendra Raje Bhosale : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलेल्या बुलेट स्वारीची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. मात्र, उदयनराजेंच्या या बुलेट स्वारीवर त्यांचे बंधू आणि भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) यांनी टीका केली आहे. 'उदयनराजेंची सर्वच कामे ही हवेत असतात, त्यांची एन्ट्री म्हणजे वाऱ्यावरची वरात' अशा शब्दात शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. साताऱ्यातील एका कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांच्यावर ही टीका केली. 


उदयनराजेंचं शिवेंद्रराजेंना प्रत्युत्तर


दरम्यान, शिवेंद्रराजे भोसले यांच्या टिकेला खासदार उदयनराजे यांनी देखील उत्तर दिले आहे. माझी उंचीच तेवढी आहे. शिवेंद्रराजे माझ्या उंचीपर्यंत येऊच शकत नाहीत, असा टोला उदयनराजेंनी शिवेंद्रराजे यांना लगावला. सर्वांचा स्वभाव सारखा नसतो, हाताची बोटे सारखी नसतात. कोणाचा स्वभाव प्रेमळ असतो, काहींना टिका केल्याशिवाय झोप येत नाही. त्यांना दोष देणार नाही माझी उंचीच तेवढी आहे. माझ्यावर टिका करण्यापेक्षा माझ्या उंचीपर्यंत त्यांनी पोहोचावे. असे उदयनराजे म्हणाले. टिका केली तर तुम्हाला पोट सुटेल असेही उदयनराजे म्हणाले.


आमच्याकडून शेवटच्या सहा महिन्यात कामे दाखवायची असे कधी होणार नाही असेही शिवेंद्रराजे म्हणाले. उदयनराजे यांची मोटारसायकल वाऱ्यावरुन आली आणि खाली उतरली. त्यांचे कामच वाऱ्यावरचे आहे असा टोला शिवेंद्रराजे उदयनराजे यांना लगावला. जमिनीला धरुन त्यांचे काहीच नसते. सगळं वरुनच त्यांचे चालू असते. स्वत: च्या कामाप्रमाणेच हवेतून मोटारसायकल आली असे शिवेंद्रराजे म्हणाले. आपल्याला तर काय हवेतील जमणार नाही, आपलं रस्त्यावर असलेलं बरं असेही   शिवेंद्रराजे यावेळी म्हणाले.


खासदार उदयनराजे भोसले हे त्यांच्या हटके स्टाईलासाठी ओळखले जातात. उदयनराजे कधी 'पुष्पा' सिनेमातील डॉयलॉग बोलतात तर कधी बाईक रायडिंग करतात. उदयनराजेंचे बाईकप्रेम हे सर्वश्रूत आहेचं. असाच त्यांचा हटके अंदाज सातरकरांना चला हवा येऊ द्या च्या कार्यक्रमात पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाच्या सेटवर उदयनराजेंनी थेट बाईकवरुन एन्ट्री केली होती. क्रेनच्या सहाय्याने 50 फुटांवरून उदयनराजे बसलेली बाईक खाली स्टेजवर आणण्यात आली होती. याच मुद्यावरुन शिवेंद्रराजे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या: