Sharad Pawar On PM Narendra Modi Statement : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरोपाला प्रत्यपत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचा 70 हजार कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (27 जून) केला होता. शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधानांच्या आरोपांना सडेतोड उत्तर दिलेय. पंतप्रधान मोदींनी ज्या शिखर बँकेचा उल्लेख केला त्या शिखर बँकेचा मी कधीच सदस्य नव्हतो असं पवार म्हणाले. त्याशिवाय सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेलाही पवारांनी उत्तर दिलेय. 


पंतप्रधान मोदींनी ज्या शिखर बँकेचा उल्लेख केला त्या शिखर बँकेचा मी कधीच सदस्य नव्हतो असं पवार म्हणाले. माझा कुठल्याही संस्थेशी संबंध नाही, असे शरद पवार म्हणाले. शिखर बँकेच्या घोटाळ्यात राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही लोकांची नावे आली होती, त्यावेळी मुख्यमंत्री भाजपचे होते , आमचा त्याच्याशी काही संबंध नाही, असेही पवार म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते ?


पंतप्रधान मोदी यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांची लिस्ट मोठी आहे,  भाजपच्या कार्यकर्त्यानी यांच्या घोटाळ्याचा मीटर बनवावा असं मोदी म्हणाले होते. तुम्हाला शरद पवारांच्या मुलीचं भलं करायचं असेल तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करा. मात्र तुम्हाला जर तुमच्या मुला-मुलींचं आणि नातवंडांचं भलं करायचं असेल तर तुम्ही भाजपाला मतदान करा, असेही मोदी म्हणाले होते.


पंतप्रधानांनी असं वक्तव्य करायला नको होते -


सुप्रिया सुळे यांच्याबद्दल पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यावरही पवारांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, मोदींनी माझ्या मुलीवर टिका केली हरकत नाही. माझी मुलगी स्वत:चं कर्तुत्व दाखवून तीन वेळा निवडून आली आहे. सुप्रिया सुळे यांना 8 वेळेला संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. मोदी साहेबांनी काही सांगितलं तरी लोकांना माहिती आहे. त्यांचं हे वक्तव्य अशोभनीय आहे, एखाद्या सदस्यावर अशी टीका करणे योग्य नाही, पंतप्रधानांनी असं वक्तव्य करायला नको होते, मी त्यावर बोलणार नाही कारण पंतप्रधान ही एक संस्था आहे, असे शरद पवार म्हणाले.


मोदी अस्वस्थ झाले आहेत -


विरोधक एकत्र आल्यामुळे मोदींकडून वैयक्तिक टीका करणे सुरु आहे. विरोधकांच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अस्वस्थता वाढली आहे. 13 आणि 14 जुलै रोजी विरोधकांची पुढील बैठक बंगलोरला होणार आहे, असे शरद पवार म्हणाले.  


आणखी वाचा :


Sharad Pawar : माझा पाठिंबा होता तर दोन दिवसात सरकार का पडले ? शरद पवार यांचे देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर