मुंबई : सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर राज्य सरकारला धक्का बसला. कोरोनाची स्थिती लक्षात घेता परीक्षा रद्द करण्याची याचिका सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याशिवाय आदित्य ठाकरे यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी आणि संस्थांनीही सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. तसेच भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील सरकारवर जोरदार टीका केली. आता या टीकेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत विरोधकांना उत्तर दिले आहे.


रोहित पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, "आमची परिक्षेबाबतची भूमिका तुमच्यासारखी राजकीय नाही तर विद्यार्थ्यांच्या काळजीपोटीच होती व राहील. पण आशिष शेलारजी बबड्याची सिरिअल पाहण्यात वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांची अडचण समजून घेतली असती तर तुम्हालाही हे पटलं असतं. आता त्यासाठी किमान आपल्या tweet खालील रिप्लाय तरी वाचाल".





एका "बबड्याच्या" हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला, असा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. सुप्रीम कोर्टानं अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याबाबत निर्णय दिल्यानंतर शेलार यांनी ट्वीट केले होते. "आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार...! ऐकतो कोण? मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं.


संबंधित बातम्या :




जगात कुठल्याही नामांकित विद्यापीठानं परीक्षेशिवाय पदवी दिली नाही - UGC उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन