ST Strike NCP Protest LIVE : गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी
एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर गोंधळ घातला. या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून आज राज्यभर आंदोलन केलं जात आहे.
अॅड. गुणरत्ने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांच्यामुळे आपल्याला जखम झाल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला होता. त्यावर न्यायाधीशांनी पाहणी केल्यानंतर सदावर्तेंच्या अंगावर कोणतीही जखम झाली नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर सदावर्तेंच्या कोणत्याही वैद्यकीय चाचणी करण्याची गरज नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं.
कायदा हातात घेणाऱ्यांवर, प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर आता इतर 109 जणांचा जामीन अर्ज नाकारत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ST Protest : 109 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कोठडी 14 दिवसांची असणार आहे
Gunratna Sadawarte : गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ST Protest : तिन्ही बाजूचा युक्तीवाद झाला असून न्यायाधीश कैलाश सावंत थोड्याच वेळात निकाल जाहीर करणार आहेत.
आंदोलनाप्रकारणी सर्व 109 आरोपींना कोर्टात हजर केले. 23 महिलांना देखील हजर केले. सर्वांनी सांगितले पोलिसांविषयी आमची कोणतीच तक्रार नाही आहे
वकील गुणरत्न सदावर्तेंना यांना ताब्यात घेताना नोटीस देण्यात आलेली नाही असं अॅड. वासवानी यांनी कोर्टात सांगितलं.
वकील गुणरत्न सदावर्तेंना 14 दिवसांची पोलिस कोठडी द्या, आरोपीवरील कलम गंभीर, सरकारी वकील घरत यांची मागणी
Ulhasnagar : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आणि माजी महापौर पंचम कलानी यांच्या नेतृत्वाखाली हे मौन आंदोलन करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या खाली काही वेळ बसून मौन ठेवून हे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी चप्पल इतर वस्तू भिरकावीत पावर यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. वकील गुणारत्न सदावर्ते यांच्या वक्तव्यामुळे या आंदोलनाला चिथावणी मिळाली अशी शक्यता वर्तवली गेली. त्यामुळे हा हल्ला झाला. त्यामुळे यांच्याच निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.
शरद पवारांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपींची संख्या एकूण 100 , आज 4 जणांचा अटक केलीय. आरोपींची संख्या मोठी असल्यानं न्यायाधीश कोर्टाच्या आवारात येतील. आरोपींची रिमांड गाडीमध्ये घेतली जाऊ शकते . सर्व कामगारांचे ब्लड सॅम्पल्स घेतले आहेत
Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्तेंना जामीन मिळणार की कोठडी वाढणार? सुनावणीकडे लक्ष https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-protest-live-after-attack-on-sharad-pawar-house-in-mumbai-by-st-strike-protester-1048808
Gunratna Sadavarte News : गुणरत्न सदावर्ते किला कोर्टात दाखल, पत्नी जयश्री पाटील आणि वकील प्रदीप घरत किला कोर्टात पोहोचले
Mumbai : मुंबईच्या एन्ट्री पॉईंट पोलिसांचा पहारा. प्रत्येक गाडीची तपासणी करून मुंबईत पाठवण्यात येत आहे. 2 लेयर ची व्यवस्था लावण्यात आली आहे. एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेरून येणाऱ्या गाड्या पोलीस अडवत आहेत.
Osmanabad : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओकवर एसटी कर्मचाऱ्यांकडून केलेल्या दगडफेक आणि चप्पल फेकीचा निषेध म्हणून उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मौन आंदोलन करण्यात आले. पवार साहेबांच्या घरावरील हल्ला म्हणजे भाजपाचे षड्यंत्र असून अॅड गुणरत्न सदावर्ते यांना हाताशी धरून भारतीय जनता पक्षाने जाणून बुजून हे कृत्य घडवून आणले असा आरोप करून अशा घटना भविष्यात खपवून घेतल्या जाणार नाहीत त्यांच्याच भाषेत जशास तसे राष्ट्रवादी काँग्रेस कडूनही प्रतिउत्तर दिले जाईल असा पवित्रा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला.
Aurangabad News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर काल झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शहर राष्ट्रवादीच्या वतीने औरंगाबादमध्ये आंदोलन करण्यात आले .शहरातील शहागंज भागात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आल. यावेळी हल्ला करणाऱ्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला. या हल्ल्याच्या पाठीमागे जो कोणी मास्टर माईंड आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली..
ST workers Strike : सीएसएमटीवरील सर्वच ST कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं
मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, प्रत्येक गाडीची तपासणी करूनच मुंबईत पाठवण्यात येत आहे, ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई बाहेरून येणाऱ्या गाड्या पोलीस अडवत आहेत
अहमदनगर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्वर ओक' या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अहमदनगरच्या वाडिया पार्क येथे राष्ट्रवादीकडून निषेध नोंदवण्यात आला... महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले... यावेळी काळ्या फिती , काळे मास्क लावून या घटनेचा निषेध नोंदवला...यावेळी राष्ट्रवादीकडून आम्ही कोणत्याही प्रकारची उग्र आंदोलन केले जाणार नाही अशी भूमिका मांडण्यात आली , आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहोत,त्यांची डोके बडकविणाऱ्यांचा आम्ही निषेध नोंदवतो असं आंदोलकांनी म्हटले आहे.
संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर दाखल
Devendra Fadnavis On Sharad Pawar : जर मीडियाला माहिती पडते, तर पोलिसांना कसं काय माहिती होत नाही. पोलिस यंत्रणा कमी पडली, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा आरोप
सीएसएमटी स्थानकात बसलेल्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना बाहेर काढलं, गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्ट येथे आणला जाणार
सीएसएमटी रेल्वे स्थानकात एसटी आंदोलकांवर कारवाई, ST कर्मचारी आहेत का याची पोलिसांकडून तपासणी, पोलिसांच्या कारवाईमुळे एसटीचे आंदोलक कर्मचारी आक्रमक
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलाय.. या हल्ल्यामागच्या सूत्रधाराला शोधून कडक कारवाई करा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.. तर हा हल्ला कोणी घडवून आणला याची माहिती मिळाल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणालेत.. तसंच सूत्रधारावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणालेत...
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन.. गुणरत्न सदावर्ते आणि देवेंद्र फडणवीसांविरोधात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची निदर्शनं.. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी.. हल्ला करणाऱ्यांवर कारवाईची मागणी..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शनिवार दि.९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी पुतळा देवळाली गाव येथे निदर्शने करण्यात येणार आहे.
पार्श्वभूमी
ST Strike : आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी काल अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी दगडफेक आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली आहे. दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असून मध्यरात्री आझाद मैदानात बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बाहेर काढले आहे. आता या आंदोलकांनी सीएसएमटी रेल्वे स्थानकात ठिय्या दिला आहे. आम्हाला पोलिसांनी मध्यरात्री लाठीचार्ज करून बाहेर काढले. आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे. बाहेरचे पोलीस आम्हाला रेल्वे स्थानकाबाहेर येऊ देत नाहीत आणि रेल्वे स्थानकातून ही पोलीस जा सांगत आहेत. यामुळे आता आम्ही काय करणार आम्ही इथेच बसून राहू असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
गुणरत्न सदावर्तेंना अटक, चार तास मेडिकल
खासदार शरद पवार यांच्या घरावर हल्ला प्रकरणी गावदेवी पोलिसांनी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना काल अटक केली. त्यांना रात्री अकरा वाजता वैद्यकीय तपासणीसाठी आधी नायर आणि मग जेजे रुग्णालयात नेण्यात आले. सुमारे चार तास त्यांची मेडिकल जेजे मध्ये करण्यात आली. पोलिसांनी त्यांना रात्रभर माध्यमांसमोर येण्यापासूनचा रोखण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी मात्र संताप व्यक्त केला आहे. आज सदावर्ते यांना अकरा वाजताच्या दरम्यान न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांनी दिली आहे.
काल सदावर्ते यांनी म्हटलं होतं की, कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले.
शरद पवारांच्या घरावर हल्लाबोल
काल दुपारच्या वेळी एसटी कर्मचाऱ्यांनी सिल्वर ओकच्या आवारात घुसखोरी करत आंदोलन केले. एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झाल्याचे दिसून आले. आंदोलकांनी थेट शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानाच्या आवारात घुसून दगडफेक, चप्पलफेक केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sharad Pawar : नेता जर शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवर दुष्परिणाम होतो; शरद पवारांचा सदावर्तेंवर नाव न घेता हल्लाबोल
- Sharad Pawar : हंगामा कोण केला याची लाय डिटेक्टर चाचणी करा: अॅड. गुणरत्न सदावर्ते
- Sharad Pawar : गुणरत्न सदावर्तेंची भाषणं तपासली पाहिजेत, त्यांनीच कर्मचाऱ्यांना उकसवलं; हसन मुश्रीफांचा आरोप
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -