NCP नगरसेवकाच्या मुलाचा व्हॉट्सअॅप मेसेज, राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक
एबीपी माझा वेब टीम | 24 Apr 2017 04:00 PM (IST)
धुळे : व्हॉट्सअॅप ग्रुपवर महिलांबाबत बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवकपुत्र देवा सोनारसह ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. धुळे महापालिकेच्या माजी महापौर जयश्री अहिरराव, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मनोज मोरे यांच्यासह राष्ट्रवादी महिला कार्यकर्त्यांनी धुळे शहर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. देवा सोनार याच्यावर यापूर्वी पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करणे, मारहाण, दहशत माजवणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. धुळे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक चंद्रकांत सोनार यांचा तो मुलगा आहे.