NCP On Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यातील राजकारणात एकच भूकंप झाला आहे. चाळीसहून अधिक आमदारांचे समर्थन शिंदे यांना असल्याने शिंदे विरुद्ध ठाकरे असा संघर्ष पाहायला मिळतो आहे. मात्र याच दरम्यान गेल्या काही दिवसांपासून या आमदारांचा हॉटेलवर होणारा खर्च देखील चर्चेचा विषय ठरला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी हा सगळा कोट्यवधीचा खर्च कोण पुरवतंय, याबाबत इन्कम टॅक्स आणि ईडीने चौकशी करावी अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी ट्वीट देखील केलंय.
याबाबत बोलताना तपासे यांनी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडावं. यासाठी काही अदृश्य शक्ती सध्या काम करत आहेत. त्या अदृश्य शक्तींनी महाराष्ट्रातल्या शिवसेनेचे काही आमदार फोडले फोडण्याचा प्रयत्न केले आणि त्यांना सर्वप्रथम सुरत येथील हॉटेलमध्ये ठेवलं त्यानंतर मध्यरात्री स्पाइस जेटच्या विमानाने गुवाहाटी नेण्यात आलं. गुवाहाटीमध्ये पंचतारांकित आलिशान हॉटेलमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली. दोन हजाराच्या वर पोलीस बलाच्या संरक्षणात त्यांच्यासाठी ठेवण्यात आलं. काही आमदारांना चार्टड प्लाईट ने बोलावण्यात आलं. या विमानाचा लाखोंचा खर्च आहे. दुसरीकडे प्रत्येक आमदाराला 50 कोटी रुपये देऊन त्याला फोडण्यात आल्याची चर्चा महाराष्ट्रातील जनतेत आहे, हा आरोप खरा आहे की खोटा आहे हे माहीत नाही परंतु या आरोपात काही तथ्य असेल तर इन्कम टॅक्स, ED विभागाने याची चौकशी केली पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सरकार अस्थिर करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी हा काळा पैसा कोणी पुरवला याची शहानिशा इन्कम टॅक्स, ईडी विभागाने केली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते महेश तपासे यांनी मागणी केली आहे.
निधीचे कारण पुढे करण्याचा केविलवाणा प्रयत्न
एकनाथ शिंदे यांच्यासह बंड पुकारलेल्या आमदारांकडून राष्ट्रवादीकडून निधी वाटपात भेदभाव करत शिवसेना आमदारांना कमी प्रमाणात निधी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत बोलताना महेश तपासे यांनी बंडखोरी झाली, महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला हे आता कोणाच्या तरी माथी मारायचं म्हणून राष्ट्रवादीच्या माथी मारायचा केविलवाणा प्रकार आहे. या आरोपात काही तथ्य नाही. बंडखोरीची काहीतरी कारण जनतेसमोर मांडली पाहिजेत म्हणून निधीचे कारण पुढे करण्यात आल्याचा पलटवार तपासे यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut : शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, ते आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील : संजय राऊत
Maharashtra Political Crisis Eknath Shinde: शिवसेनेच्या बंडाची लढाई आता कोर्टात; शिंदे गट घेणार सुप्रीम कोर्टात धाव