नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court)  अजित पवारांना (Ajit Pawar)  तीन आठवड्यांची वेळ दिली आहे. सुप्रीम कोर्टात आज उत्तर सादर करण्याचे आदेश अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP) होते. मात्र अजित पवार गटातर्फे कोर्टाकडे वाढीव वेळेची मागणी करण्यात आली. ती मागणी मान्य करत सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना वाढीव वेळ दिली आहे.


सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी होणार होती. सकाळी अजित पवारांच्या वतीने त्यांच्या प्रकरणाचा उल्लेख कोर्टासमोर करण्यात आला. अजित पवार गटाने तीन आठवड्यांचा वेळ त्यांचे उत्तर सादर करण्यासाठी वाढवून मागितला आहे.  त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांना तीन आठवड्यांचा वेळ दिला आहे.  गेल्या सुनावणीत अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी त्यांच म्हणणं सादर कराव असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.


दोन्ही प्रकरणाची सुनवाणी एकाच दिवशी


राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदार अपात्रता या दोन्ही प्रकरणाची सुनावणी एकाच वेळी घ्यायची असे सुप्रीम कोर्टाने ठरवले होते. दोन्ही प्रकरणे जवळपास सारखीच आहे. सुनावणी एकत्र न घेता एकाच दिवशी लागोपाठ घ्यायची असे ठरवले होते. त्यानंतर आज सुनावणीची वेळ ठरली होती. सरन्यायाधीशांसमोर एकूण आज 14 प्रकरणे होती. त्यात सातव्या क्रमांकावर आमदार अपात्रता प्रकरण होते. पहिल्यांदा शिवसेना आणि त्यानंतर लगेचच राष्ट्रवादी आमदार प्रकरणाचे प्रकरण होते. 






41 आमदारांचे म्हणणे एकत्र करण्यासाठी वाढीव वेळ मागितली


गेल्या वेळी सुप्रीम कोर्टाने अजित पवारांसह असलेल्या 41 आमदारांनी त्यांचे  म्हणणे सुप्रीम कोर्टाकडे दाखल करायचे  असे आदेश दिले होते. सकाळी सुप्रीम कोर्टात ज्यावेळी हे प्रकरण मेन्शन करण्यात आले होते. सु्पीम कोर्टाकडे वेळ मागितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने तो वेळ दिला आहे.  41 आमदारांचे सगळे म्हणणे एकत्र करून द्यायचे आहेत त्यासाठी दोन आठवडे लागतील. त्यानंतरच्या आठवड्यात ते सगळे एकत्र करुन सुप्रीम कोर्टाकडे सादर करू, असे नीरज किशन कौल यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले.  


हे ही वाचा :


Sanjay Raut: शिवसेना एकनाथ शिंदेंची म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांना संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, तुम्ही बाबासाहेबांचे वारस...