Dattatray Bharne : महावितरणकडून शेतकऱ्यांच्या (Farmers) कृषी पंपाच्या थकीत बिलाच्या वसुलीसाठी सध्या वीज तोडणी मोहीम सुरू आहे. यावरुन महाविकास आघाडीमधील माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना त्यांच्याच शब्दाची आठवण करून दिली आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीसांनी मध्यप्रदेशमध्ये भाजप सरकारनं शेतकऱ्याचे संपूर्ण वीज बिल माफ केली आहे. महाविकास आघाडीनं देखील त्या पद्धतीने वीज बिल माफी करावी अशी मागणी केली होती, असे भरणे म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांना आता कोंडीत पकडण्यापेक्षा तुम्ही तुमचा शब्द पाळा आणि शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा अशी मागणीच आमदार भरणे यांनी केली आहे.


Dattatray Bharne on Power cuts : शेतकऱ्यांची वीज तोडणी ताबडतोब बंद करावी


शेतकऱ्यांची वीज तोडणी (Power cuts) ताबडतोब बंद करावी, अशी विनंती देखील दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी केली. फडणवीसांनी विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याची मागणी केली होती. आता त्यांचे सरकार आहे. त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द आता पाळावा असे भरणे म्हणाले. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करुन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी भरणेंनी यावेळी केली.   


Dattatray Bharne On Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊसाची बिलं अदा करावी


भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखाना आणि नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गाळप झालेल्या उसाचं बील शेतकऱ्यांना देण्यास विलंब झाला आहे. पुणे जिल्हा बँक कधीही शेतकऱ्यांची अडवणूक करत नाही. नुकतेच तुम्हाला पुणे जिल्हा बँकेकडून 200 कोटी रुपयांचं कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळं आता विलंब न करता माझ्या शेतकऱ्याला (Farmer) व्याजासकट त्याचं बिल अदा करा अशी मागणी भरणे यांनी केली आहे. महरासाष्ट्रातील कोणताही साखर कारखाना असा राहिला नाही की त्याने शेतकऱ्यांचे बिल दिले नाही. पण नीरा भीमा आणि कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याने ऊसाची (SugarCane) बिल देण्यात विलंब केल्याचे भरणे म्हणाले. शेतकऱ्यांनी निषेध करावा अशी ही गोष्ट असल्याचे भरणे म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pune-Indapur News: हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे एकाच मंचावर; अनेक विषयांवरुन एकमेकांवर हल्ला बोल