मुंबई : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून सुरु असलेलं आऊटगोईंग थांबण्याचं नाव घेत नाही. बीडमधील राष्ट्रवादीचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा सेनाप्रवेश पार पडला. जिल्हा परीषद, पंचायत समिती सदस्य, बाजार समिती संचालक, खरेदी विक्री संचालक, सरपंच, सेवा सोसायटी चेअरमन तसेच राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारीही बदामराव पंडित यांच्यासह शिवसेनेत दाखल झाले आहेत.
सोमवारीच राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी राष्ट्रवादीला राम राम करत शिवसेनेत प्रवेश घेतला.‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नगरसेवक संजय भोईर यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नगरसेवक देवराम भोईर आणि उषा भोईरही शिवसेनेत दाखल झाले आहेत.