अकोला : अकोल्यात दुचाकी चोरी प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

अकोल्यातील दुचाकी प्रकरणातील आरोपी चेतन प्रभाकर मानतकरनं दोन दिवसांपूर्वी पोलीस स्टेशनमध्ये विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी तो थोडक्यात बचावला होता. मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्यानं त्याला अकोल्याच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान चेतन मानतकरचा मृत्यू झाला आहे. अकोला एमआयडीसीमधील प्रकारानं खळबळ माजली आहे.