Why I killed Gandhi: राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावरुन राज्याच्या राजकारणात थिणगी पडल्याची दिसून येत आहे. अमोल कोल्हे यांनी या चित्रपटामध्ये नथुराम गोडसेची (Nathuram Godse) भूमिका साकारल्यानं नवा वाद सुरु झालाय. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या  (NCP) नेत्यांकडून अमोल कोल्हेंची पाठराखण केली जात आहे. अमोल कोल्हेंनी कलाकार म्हणून नथुराम गोडसेची भूमिका साकारली असल्याचं म्हटलं जातंय. 


अमोल कोल्हे यांच्या ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट येत्या 30 जानेवारी 2022 ला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यावर अमोल कोल्हे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या चित्रपटाचं शूटिंग आपण राजकारणात येण्याच्या आधीच झालं होतं, असं आमोल कोल्हेंनी म्हटलंय. 


शरद पवार काय म्हणाले?
गांधी यांच्यावरचा सिनेमा अमेरिकेतून प्रसिद्ध झाला. नाव मला आठवत नाही, पण अॅक्टर म्हणून ज्याने ही भूमिका केली, तो गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला, गांधींचं महात्म्य जगात त्याच्यामुळं आलं. त्या सिनेमातसुद्धा कुणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. नथुराम गोडसेची भूमिका केली तो आर्टिस्ट होता, नथुराम गोडसेने कुठल्याही चित्रपटात, आर्टिस्ट एखादी भूमिका घेत असेल तर ती आर्टिस्ट म्हणून भूमिकेकडे पाहिलं पाहिजे. 


जयंत पाटील का म्हणाले?
अमोल कोल्हेंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं कतृत्व आणि जीवनपट घराघरात पोहोचवलंय. त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रावादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर ते खासदार म्हणून निवडून आले. लोकांनी त्यांना उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांची भाषणं चांगली असतात. त्यांनी अनेक महत्वाचे प्रश्न सभागृहात मांडले आहेत. कलाकार म्हणून पूर्वी काही भूमिका केली असेल तर आज त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलण्याची गरज नाही, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच अमोल कोल्हे यांचे विचार शाहू, फुले आणि आंबेडकरांचेच आहेत, असंही जयंत पाटलांनी म्हटलंय. 


रोहित पवार काय म्हणाले?
राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सिनेमात केलेल्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेवरून प्रचंड राजकारण तापले आले आहे.याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, एखादा कलाकार एखादी भूमिका करतो म्हणजे प्रत्यक्ष जीवनात त्याचे विचार तसेच असतात असं नाही. तसच त्यांनी हा चित्रपट राजकारणात येण्याआधी केला आहे त्यामुळे विनाकारण या विषयावरून राजकारण व्हायला नको.सोबतच जर यावरून राजकारणच करायचे असेल तर भाजपमधील देखील अनेक नेत्यांनी चित्रपटात भूमिका केल्यात त्यांचे सर्व चित्रपट पाहावे लागतील


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha