मुंबई: 'राज्यातील सर्व महापालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुका यापुढे स्बळावर लढणार.' अशी गर्जना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. गोरेगावच्या पदाधिकारी मेळाव्यात हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये आणि जयघोषामध्ये ही घोषणा करण्यात आली आहे.


मुंबईसह 10 महापालिकांच्या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष रंगणार आहे. विशेष म्हणजे गोरेगावातील शिवसैनिक मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. शिवसैनिकांच्या घोषणांनी सभागृह दणाणून गेलं. आणि याच आवेशपूर्ण वातावरणात उद्धव ठाकरेंनी स्वबळावर भगवा फडणविण्याची घोषणा केली.



'गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली'

'गेली 25 वर्ष शिवसेना युतीत सडली. पण आता ही फरफट होणार नाही. तुम्ही मला वचन देत असाल तर आज मी निर्णय घेतो आहे की, आता यापुढे शिवसेना महाराष्ट्रात भगवा फडकवेल. कोणाच्याही समोर युतीसाठी कटोरं घेऊन जाणार नाही. महाराष्ट्रात कुठेही यापुढे मी युती करणार नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेतल्याचं जाहीर केलं.

'यापुढे महाराष्ट्रात शिवसेना स्वबळावर लढणार'

'युतीच्या बैठकीत 114 जागांची मागणी भाजपकडून करण्यात आली. हा शिवसेनेचा अपमान होता. त्यानंतर कोणताही फोन मला आला नाही. आमच्या अनिल देसाईंना आज फोन आला होता. 'बघू युती झाली तर वैगरे..' असं त्यावेळी फोनवर त्यांनी सांगितलं.'

'शिवसेनेची गेली 25 वर्ष युतीमध्ये सडली. पण आता यापुढे मी कुणासमोर झुकणार नाही, वाकणार नाही. आज शिवसेनेच्या नव्या वाटचालीची घोषणा करतो आहे. मी निखाऱ्यावर चालणार आहे. तुम्हालाही माझ्यासोबत निखाऱ्यासोबत चालावं लागणार आहे. त्यामुळे यापुढे शिवसेना महाराष्ट्रात स्वबळावर भगवा फडकवेल. शिवसेना महाराष्ट्रात कुठेही युती करणार नाही. यापुढे कुणासमोरही कटोरं पसरणार नाही.'



'राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणा'

'राज्य आणि केंद्र सरकारच्या कारभारात पारदर्शकता आणा. स्थायी समितीमध्ये सर्व पक्षांचे सदस्य असतात, पत्रकार, आयुक्तही असतात अशीच पद्धत राज्य सरकारमध्ये आणा. हिम्मत असेल तर राज्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांना कॅबिनेटच्या बैठकीत घ्या, पत्रकारांना बोलवा, लोकायुक्तांनाही बोलवा मग घोटाळ्याचे आरोप होणार नाही.'

'उधळलेल्या बैलाला वेसण घालायची आहे'

'तमिळनाडूमध्ये बैलापेक्षा जास्त पिसाळून जनता रस्त्यावर उतरली आहे, आपल्यालाही उधळलेल्या बैलाला वेसण घालायची आहे, हे देखील जलिकट्टूच आहे आणि जर या बैलाला वेसण घालायची हिम्मत मनगटात नसेल तर हातामध्ये भगवा पकडू नका.'



'एक पुरस्कार गुरुदक्षिणा म्हणून दिला गेल्याची चर्चा आहे'

'काल देण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये एक पुरस्कार 'गुरूदक्षिणा' म्हणून दिला गेला अशी चर्चा आहे.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे:

LIVE: काय बोलणार? याकडे सर्व देशाचं लक्ष: उद्धव ठाकरे

LIVE: माझ्या मनातलं लोकांनी ओळखलंय: उद्धव ठाकरे

LIVE: लोकांच्या मनातलं मी ओळखलंय: उद्धव ठाकरे

LIVE: सरकारमध्ये नालायक लोकं बसलेत: उद्धव ठाकरे

LIVE: देव-देवतांचे फोटो काढण्याचा फतवा सहन करणार नाही: उद्धव ठाकरे

LIVE: हिंमत असेल तर समान नागरी कायद्यासाठी अध्यादेश काढा: उद्धव ठाकरे

LIVE: खादीबाबतच्या कॅलेंडरवरुन गांधींचा फोटो का हटवला?: उद्धव ठाकरे

LIVE: जलीकट्टूतला उद्धळलेला बैल आवरण्याची गरज: उद्धव ठाकरे

LIVE: भाजप कसल्या परदर्शीच्या गप्पा मारतंय?: उद्धव ठाकरे

LIVE: जेवढा पारदर्शी कारभार महापालिकेत आहे, तोच कारभार केंद्र आणि राज्य सरकारमध्ये आणून दाखवा: उद्धव ठाकरे

LIVE: कॅबिनेटमध्ये पारदर्शीपणा पाहिजे: उद्धव ठाकरे

LIVE: पारदर्शी कारभारासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यालाही कॅबिनेट बैठकीत बोलवा: उद्धव ठाकरे

LIVE: शिवसेनेत गुंडांना थारा नाही: उद्धव ठाकरे

LIVE: सत्तेची मस्ती दाखवून कारभार करणार असाल, तर आम्ही मोडून काढू: उद्धव ठाकरे

LIVE: कामं करुन मतं मागतो, थापा मारुन मतं मागत नाही: उद्धव ठाकरे

LIVE: भाजपच्या बैलाला रोखा, रस्त्यावर उतरुन लढा: उद्धव ठाकरे

LIVE: भाजपनं ११४ जागाची मागणी करणं शिवसेनेचा आपमान: उद्धव ठाकरे

LIVE: आम्ही कष्टावर जागा मागतो, थापावर जागा मागत नाही: उद्धव ठाकरे

LIVE: माझ्या घरात घुसून मारणार असाल, तर मी पंचारती करु का: उद्धव ठाकरे

LIVE: शिवसेनेची 25 वर्ष युतीमध्ये सडली: उद्धव ठाकरे

LIVE: सत्तेसाठी शिवसेनेचा जन्म नाही: उद्धव ठाकरे

LIVE: शिवसेनेला वज्रमुठ द्या, दात पाडायचं काम मी करेन : उद्धव ठाकरे

LIVE: भविष्यात शिवसेना एकटी महाराष्ट्रात भगवा फडकवेल : उद्धव ठाकरे

VIDEO:



संबंधित बातम्या:

एबीपी माझा सर्व्हे: शिवसेना स्वबळावर मुंबई पालिका काबीज करू शकेल?

जे येणार नाहीत, त्यांच्या शिवाय परिवर्तन होणारच!: मुख्यमंत्री

शिवसेनेचे सर्व मंत्री बॅगा भरुन तयार आहेत: सुभाष देसाई