Jayant Patil : राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपचे संतुलन बिघडले आहे. भाजपने सर्व आमदार हाताळवून पहिले, सरकार पाडण्याचे प्रयत्न केले मात्र, ते होतं नाही म्हणून मागील काहीच दिवसापासून वेगवगेळे आरोप सुरु असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. अनेकांनी भाजप सोडण्याचा विचार सुरु केला आहे. सोलापुरातील अनेक लोक बिज्जू प्रधाने यांच्या पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील यात शंका नसल्याचे जयंत पाटील म्हणाले. सोलापूरवर शरद पवार यांचं विशेष प्रेम आहे. त्यामुळे जर सोलापूर पालिका जर राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली तर आम्ही सर्व जण विशेष लक्ष देऊ, तसेच सोलापूरचे प्रश्न सोडवण्यास कटीबद्ध राहू असेही पाटील म्हणाले.


रात्री 12 वाजता सोलापूर देखील कार्यकर्ते जमतात, म्हणजे व्यक्ती महत्वाचा असतो. ज्या पक्षातून बिज्जू प्रधाने येत आहेत त्या पक्षाला कार्यकर्त्यांना वापरायची आणि गरज संपली की सोडायचा छंद जडला असल्याचे म्हणत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. माझ्या जिल्ह्यातील जवान आज शहीद झाला, त्यामुळे तिथून यायला मला उशीर झाला आहे. कार्यक्रम उशिरा झाला त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, उशीर झाला तरी कार्यकर्त्याला ओलांडून जाणे जमत नसल्याचे जयंत पाटील म्हणाले.


राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला काल सोलापूर जिल्ह्यातून सुरूवात झाली.  यावेळी संवाद यात्रा रात्री उशीरा सोलापूरमध्ये आली. यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला. केंद्राकडून होत असलेली महाराष्ट्राची बदनामी आणि महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी भाजपचे नेते बिज्जू प्रधाने यांचा राच्री 12 वाजता जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. 


2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी परिस्थिती विचित्र होती. लोक पक्ष सोडून जात होते. राष्ट्रवादीचा निकाल चांगला लागणार नाही, असे भाकीत माध्यमे व्यक्त करत होते. तेव्हा पवार साहेबांनी संपुर्ण राज्याचा झंझावाती दौरा केला आणि लोकांनी साहेबांच्या प्रत्येक सभेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. सोलापूरातही भव्य सभा घेण्यात आली आणि लोकांनी पवार साहेबांसह आम्हा सर्वांना साथ दिली. महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होणार नाही, असे सतत बोलले जात होते. मात्र पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आल्याचे पाटील यावेळी म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: